Rahul Dravid Defends Indian Tracks: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind vs Aus) सध्या सुरु असलेल्या मालिकेसंदर्भात भाष्य केलं आहे. सध्याची मालिका ही फिरकी गोलंदाजांसाठी लाभदायक ठरणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळवली जात असल्याच्या मुद्द्यावरुन आपल्याला कोणतीही खंत वाटत नाही असं द्रविड म्हणाला आहे. या खेळपट्ट्यांसंदर्भात उगाच आपल्याला वाईट वाटून घेण्याचं कारण नसल्याचं अधोरेखित करताना द्रविडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final) स्पर्धेत मिळवलेले गुण महत्त्वाचे आहेत, असं म्हटलं आहे. तसेच अनेक देश आता कसोटीचा निकाल लागेल अशा खेळपट्ट्या तयार करत आहेत, असंही द्रविडने म्हटलं आहे.


भारत 2-1 ने आघाडीवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेमध्ये सध्या भारत 2-1 ने आघाडीवर आहे. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी ही खराब असल्याचा शेरा सामनाधिकारी क्रिस ब्रॉड यांनी दिला आहे. यानंतर फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार केल्या जात असल्याच्या मुद्द्यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. अशा खेळपट्ट्यांवर कसोटी सामना 3 दिवसांच्या आत संपतो अशी टीका केली जात आहे.


जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा केला उल्लेख


द्रविडने नागपूर, दिल्ली आणि इंदूरमधील खेळपट्ट्यांसंदर्भात भाष्य करताना खेळपट्ट्या तयार करणाऱ्यांची बाजू घेतली आहे. "मी याबद्दल फार सविस्तर बोलणार नाही. सामाधिकारी त्यांचे स्वतंत्र विचार मांडू शकतात. मी त्यांच्या विचारांशी सहमत आहे की नाही हे फार महत्त्वाचं नाही. मला काय वाटतं हे इथं महत्त्वाचं ठरत नाही. मात्र डब्ल्यूटीसीचे (जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे) गुण या सामन्यांवर आधारित असतील तर निकाल निघेल अशाच खेळपट्ट्यांवर खेळलं पाहिजे," असं द्रविडने स्पष्टपणे सांगितलं.


हे सर्वच ठिकाणी होतं


मात्र त्याचवेळी द्रविडने आवर्जून असाही उल्लेख केला की मागील काही वर्षांमध्ये संघांनी घरातील मैदानांवर ज्यापद्धतीच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत, त्यावर खेळणं आव्हानात्मक आहे. "असं होऊ शकतं आणि असं केवळ भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये हे होत आहे. कधीतरी प्रत्येकासाठी योग्य संतुलन कसं असेल याचा अंदाज बांधणं शक्य होत नाही. बरं हे केवळ भारतात होत नाही तर अन्य ठिकाणीही होतं," असं द्रविड म्हणाला. 


प्रत्येकजण निकाल निघतील अशाच खेळपट्टी...


"जेव्हा आम्ही परदेशी दौऱ्यावर जातो तेव्हा आम्हाला फारच आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळावं लागतं. आम्ही नुकतेच दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळलो जिथे फिरकी गोलंदाजांचा काहीच परिणाम दिसून आला नाही. प्रत्येकजण निकाल निघतील अशाच खेळपट्टी तयार करण्याला प्राधान्य देतो," असंही द्रविडने सांगितलं.