Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला. नुकतंच मुंबईने हार्दिक पंड्याचा टीममध्ये समावेश केला होता. यानंतर शुक्रवारी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. ही घोषणा करताच मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. यानंतर चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. 


रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते नाराज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सने टीमची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सिझनमध्ये रोहित कर्णधार म्हणून नाही तर फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकता आली असून गेली दहा वर्षे तो टीमची धुरा सांभाळतोय. रोहितचे कर्णधारपद गमावल्याने चाहते खूपच नाखूश आहेत. 







रोहितने 5 वेळा बनवलं मुंबईला चॅम्पियन


रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवलंय. हिटमॅन 2011 मध्ये मुंबईच्या टीममध्ये सामील झाला होता. यानंतर 2013 मध्ये त्याच्याकडे टीमची धुरा सोपवण्यात आली. रोहितने त्याचवेळी प्रथमच टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली होती. यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.


कर्णधार म्हणून हार्दिकचा रेकॉर्ड कसा आहे?


आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा विक्रम चांगला आहे. हार्दिकने पहिल्याच सिझनमध्ये आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं होतं. तर दुसऱ्या सिझनमध्येही हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातची टीम अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यामुळे आता हार्दिक मुंबई इंडियन्सची कमान कशी सांभाळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.