श्रीलंकेविरुद्धच्या वनडेपूर्वी कोहली- धोनी आमनेसामने
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होतेय. उद्या म्हणजेच २० ऑगस्टला पहिली वनडे खेळवण्यात येणार आहे.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होतेय. उद्या म्हणजेच २० ऑगस्टला पहिली वनडे खेळवण्यात येणार आहे.
या सामन्याआधीच मैदानावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली एकमेकांविरुद्ध भिडले. दोन्ही क्रिकेटर्स फुटबॉलची मॅच खेळताना आमनेसामने आले होते.
खरंतर, सराव सत्रादरम्यान, भारताचे क्रिकेटर्स अनेकदा फुटबॉल खेळतात. बीसीसीआयने हा फोटो शेअर करताना, विराट कोहली विरुद्ध एमएस धोनी विरुद्ध लोकेश राहुल फुटबॉलमध्ये असं म्हटलंय.