दुबई : आयपीएलच्या 13 व्या सीजनमध्ये आजचा 21 वा सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात होत आहे. या दरम्यान चेन्नईचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जबरदस्त फिल्डींग करत सगळ्यांनाच हैराण केलं. सुनील नरेनला आऊट करत जडेजाने माघारी पाठवलं. स्पिनर कर्ण शर्माच्या बॉलवर नरेनने लॉ़ग ऑनवर शॉट मारला. बॉल सीमारेषेवर पडण्याआधी जडेजाने डाय मारत कॅच पकडला. पण बाँड्री लाईनला टच होण्याआधीच त्याने बॉल फाफ डु प्लेसीकडे टाकला. त्याने देखील बॉल पकडला आणि नरेनला माघारी जावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाचा हा कॅच आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनी देखील जडेजाची फिल्डिंग पाहून हैराण झाला. नरेन देखील पाहातच राहिला.



आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत अनेक कॅच पाहायला मिळाले. जे नेहमी चर्चेत राहतील. याआधी किंग्स इलेवन पंजाबचा खेळाडू निकोलस पूरनने देखील हैराण करणारा कॅच पकडला होता.


रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 65 कॅच पकडले आहेत. मैदानावर उत्कृष्ठ फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंमध्ये जडेजा मोजला जातो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड रैनाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 102 कॅच पकडले आहेत. 100 पेक्षा अधिक कॅच पकडणारा तो एकमेव खेळाडू आहे. तर विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये धोनी आणि दिनेश कार्तिकने देखील 100 हून अधिक कॅच पकडले आहेत.