नवी दिल्ली : भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर रवींद्र जडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत. संपूर्ण देशाला फिट राहण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रोत्साहन देत असल्याने त्याने आभार मानलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेदरलँड दौऱ्यावर गेले असताना तेथील पंतप्रधानांनी मोदींना सायकल भेट दिली.मोदींचा सायकलवरील फोटो पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जडेजाने मोदींचे ट्विटरवरुन आभार मानलेत. 


सध्या जडेजा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. येत्या ३० जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरी वनडे खेळली जाणार आहे.