ICC Test Rankings: इंग्लंडचा वेगवान (England fast Bowler) गोलंदाज जेम्स अँडरसनचं (James Anderson) जसं जसं वय वाढतंय, तसं तसं त्याची गोलंदाजी अजूनच कमाल दाखवू लागलीये. नुकंतच आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या टेस्ट सामन्यांच्या (ICC Test Rankings) ताज्या आकडेवारीमध्ये अँडरसनने बाजी मारली आहे. जेम्सने टेस्ट रॅकिंगमध्ये  (Test Rankings) ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंसला मागे टाकत जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी जेम्स अँडरसनने ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 


अँडरसनने 87 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँडरसनने त्याच्या कामगिरीने 87 वर्षांचा खास रेकॉर्ड मोडलाय. 40 वर्षे आणि 207 दिवस वयाचा अँडरसन टेस्टमध्ये नंबर वन गोलंदाज बनलाय. अँडरसन हा 1936 मध्ये ऑस्ट्रेलियन महान क्लॅरी ग्रिमेट नंतर पहिल्या क्रमांकावर असलेला सर्वात वयस्कर गोलंदाज आहे. अँडरसनच्या आधी पॅट कमिन्स हा नंबर वन गोलंदाज होता. कमिन्स हा 1,466 दिवस टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता.



भारतीय गोलंदाजांची रँकिंगमध्ये कमाल


टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विनने रँकिंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. अश्विन शिवाय रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना देखील आयसीसीच्या रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये या खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तर नंबर 1 बनण्याची जेम्स अँडरसनची ही सहावी वेळ आहे. 


अँडरसन पहिल्यांदा 2016 मध्ये टेस्ट नंबर 1 बनला होता. त्यावेळी त्याने स्टुअर्ट ब्रॉड आणि अश्विनला मागे टाकलं होतं. यानंतर 2018 मध्ये देखील त्याने पुन्हा ही कामगिरी केली होती. टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो केवळ मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्या मागे आहे.


याशिवाय रविंद्र जडेजा ऑलराऊंडर खेळाडूंच्या रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर कायम आहे. तर जडेजा गोलंदाजांच्या टेस्ट रँकिंगमध्ये  टॉप-10 मध्ये सामील झालाय. या यादीत जडेजा 9 व्या स्थानावर आहे. जसप्रित बुमराह पाचव्या स्थानावर असून टेस्ट रँकिंगमध्ये अक्षर पटेलला देखील फायदा झाला आहे.