मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर जेम्स आपल्या वाढदिवशी भलताच ट्रोल झाला. जेम्सनं केलेलं एक ट्विट त्याला भलतंच महागात पडलं. आपल्या मित्राला 'बॉयफ्रेंड' म्हणणाऱ्या जेम्सला त्याच्या फॅन्सनं 'समलैंगिक' असल्याचं मानलं... यानंतर जेम्स फॉकनरला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय. आपण समलैंगिक नसल्याचं स्पष्टीकर जेम्सनं मंगळवारी दिलंय. त्याच्या टीमनंही त्याच्याकडून अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी २९ एप्रिल रोजी आपल्या वाढदिवशी त्यानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यानं आईसोबत आणि पुरुष मित्र रॉबर्ट जुब याच्यासोबत केलं. याच निमित्तानं सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्यानं पोस्टमध्ये जुबचा उल्लेख 'बॉयफ्रेंड' म्हणून केला... सोबतच हॅशटॅगमध्ये लिहिलं होतं 'पाच वर्षांपासून सोबत'... यामुळे हा क्रिकेटर समलैंगिक असल्याचं अनेकांनी मानलं. 



या पोस्टनंतर फॉकनर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला स्पष्टीकरण द्यावं लागलंय. आपल्या नव्या ट्विटमध्ये फॉकनर म्हणतो, 'माझ्या कालच्या ट्विटमुळे काहीतरी भ्रम निर्माण झालाय. एलजीबीट समुदायाकडून समर्थन मिळणं खूपच शानदार होतं, पण मी समलैंगिक नाही... प्रेम हे प्रेमच असतं हे कधीही विसरू नका पण रॉबर्ट जुब माझा केवळ एक चांगला मित्र आहे. काल आम्ही एकत्र राहत पाच वर्ष पूर्ण केली एवढचं... सहकार्य करण्यसाठी सर्वांचे आभार'.



जेम्स फॉनर ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर खेळाडू आहे. परंतु, ३० मेपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकपसाठी त्याचा समावेश ऑस्ट्रेलियन टीममध्ये होऊ शकलेला नाही. फॉकनर ऑस्ट्रेलियासाठी एक टेस्ट, ६९ वन डे आणि २४ टी ट्वेन्टी मॅच खेळलाय. त्यानं भारताच्या विरुद्ध भारतातच खेळलेली वन डे मॅच आत्तापर्यंतची त्याची शेवटची मॅच राहिली.


यापूर्वी, इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर स्टीवन डेविस यांनी २०११ मध्ये समलैंगिक असल्याचा खुलासा केला होता. असा खुलासा करणारे ते पहिले क्रिकेटर ठरले होते.