साऊथेम्पटन : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळवला जातोय. दुसऱ्या डावात भारताची अवस्था काहीशी बिकट झाली आहे. पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या कायले जेमिनसनने दुसऱ्या डावातही भारताचा दणका दिलाय. 2 बाद 64 धावसंख्येवरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला सलग दोन धक्के बसले. 13 धावांवर खेळणाऱ्या विराट कोहलीला जेमिनसनने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. तर पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डावात भारताने 4 विकेट गमावल्या असून 57 धावांची आघाडी घेतली आहे. 


त्याआधी मोहम्मद शमी आणि ईशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा पहिला डाव 99.2 षटकात 249 धावांवर संपुष्टात आला. शमीने 4 तर ईशांत शर्माने 3 विकेट घेतल्या.