महापौरांचा मेडलला `एकच चावा` आणि गोल्ड मेडलिस्ट हिरमुसली, पण का...?
जपानची महिला सॉफ्टबॉल खेळाडूने जिंकलेल्या गोल्ड मेडलला महापौरांनी घेतला चावा
जपान : जपानची महिला सॉफ्टबॉल अॅथलिट मियू गोटोने नुकतेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलं. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं असून मियू फार आनंदात होता. मात्र तिच्या या आनंदावर जपानच्या नागोया शहराच्या महापौर ताकाशी कावामुरा यांनी विरजण घातलं.
मियूने पदक जिंकल्यानंतर महापौर ताकाशी कावामुरा यांची भेट घेतली. यावेळी मियू गोटोचे पदक महापौर कावामुरा यांनी दाताने कचकचून चावलं. खेळाडूच्या पदकाचा चावा घेतल्यानंतर एकच गोंधळ झाला. त्यानंतर अनेक स्तरांवरून टीका करण्यात आला.
हे गोल्ड मेसं असं चावून महापौर ताकाशी कावामुरा कोव्हिड-19 संदर्भातील नियम तोडले आहेत अशी टीका करण्यात आली. त्याचप्रमाणे महापौरांच्या या कृतीतून त्यांना खेळाडूने कमावलेल्या मेडलच्या प्रती आदर नसल्याचं दिसतं असंही बोललं गेलं.
दरम्यान सर्व स्तरावरून टीका सुरु झाल्यानंतर ओरड सुरू झाल्यावर महापौरांनी माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे गोल्ड बदलण्यासाठी येणारा खर्च देण्याचंही सांगितलं आहे. त्यानंतर आता ऑलिम्पिकच्या अधिकाऱ्यांनी तिला नवं चांगलं न चावलेलं पदक देण्याचा निर्णय घेतला आहे.
जपानने सॉफ्टबॉलमध्ये मियूने अमेरिकेच्या खेळाडूला पराभूत करुन पदक मिळवलं होतं. संपूर्ण जपान यामुळे फार आनंदात होतं. मात्र महापौरांनी या मेडलचा चावा घेतला आणि सर्वांचा रोष ओढावून घेतला. हे कृत्य त्या खेळाडूप्रतीही असभ्य असून सध्याच्या घडीला असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात आली आहे.