सिडनी :  ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची धुरा पहिल्यांदा एखादा भारतीय वंशाचा क्रिकेटर सांभाळणार आहे. २०१८ च्या सुरूवातीला होणाऱ्या आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. 


स्टीव वॉच्या मुलगाही संघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व मूळचा भारतीय असलेल्या जेसन सांघा यांच्याकडे देण्यात आले आहे. या टीममध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या स्टीव वॉ चा मुलगा ऑस्टीन वॉ देखील यात सामील आहे. हे पहिल्यांदा आहे की कोणत्याही भारतीय वंशाच्या खेळाडूला कांगारू टीमची धुरा सोपविण्यात आली. 


उपकर्णधार अधिकाऱ्याचा मुलगा


ईएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांचा मुलगा विल सदरलँड यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला उपकर्णधार बनविण्यात आले आहे. या खेरीज सांघासोबत आणखी एक भारतीय वंशाचा खेळाडू संघात आहेत. परम उप्पल या भारतीय वंशाच्या खेळाडूलाही संधी देण्यात आली. 


१८ वर्षी झळकावले शतक


भारतीय वंशाचा जेसन सांघा याचे संपूर्ण नाव जेसन जसकीरत सिंग सांघा आहे. त्याने नुकतेच १८ वर्षाच्या वयात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरूद्ध शतक झळकावले आहे. जगात कमी वयात प्रथम श्रेणी झळकावणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. सचिन १७ व्या वर्षी पहिला शतक झळकावले आहे. 


हा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ 


ऑस्ट्रेलिया टीम :  जेसन सांघा (कर्णधार ) विल सदरलैंड (उपकप्तान), जेवियर बार्टलेट, मेक्स ब्रेंट, जेक एडवर्ड्स, जेक इवांस, जेरोड फ्रीमेन, रयान हेडली, बेक्टर होल्ट, नाथन मैक्स्वीनी, जोनाथन मेर्लो, जेसन रेल्स्टोन, परम उप्पल, ऑस्टिन वॉ, लॉयड पोप.