मुंबई : मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. मात्र मुंबईच्या जसप्रीत बुमराहने एक विक्रम केला. जसप्रीत बुमराहने T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. मुख्य म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला केवळ एक विकेट मिळाली. दरम्यान ही त्याची टी-20 क्रिकेटमधील 250 वी विकेट ठरली. वॉशिंग्टन सुंदरची ही विकेट असून जसप्रीत बुमराहने त्याला क्लीन बोल्ड आऊट केलं.


जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 206 टी-20 सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याच्या नावे एकूण 250 विकेट आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात व्यतिरिक्त भारताकडून खेळलेल्या टी-20 सामन्यांचाही समावेश आहे.


T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय


  • जसप्रीत बुमराह- 250 विकेट

  • भुवनेश्वर कुमार- 223 विकेट

  • जयदेव उनादकट- 201 विकेट

  • विनय कुमार- 194 विकेट

  • इरफान पठान- 173 विकेट  



जसप्रीत बुमराहने ज्यावेळी 250 विकेट घेतली तेव्हा त्याची पत्नी आणि टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशनही मैदानावर उपस्थित होती. यावेळी टीव्ही स्क्रीनवर संजना गणेशनची प्रतिक्रियाही दाखवण्यात आली. या सिझनमध्ये जसप्रीत बुमराहने 13 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्यात. मुंबईच्या टीमसाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.