Video: जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरपेक्षाही जलद बॉलिंग
चेतेश्वर पुजाराचं शतक आणि भारताच्या भेदक बॉलिंगमुळे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे.
ऍडलेड : चेतेश्वर पुजाराचं शतक आणि भारताच्या भेदक बॉलिंगमुळे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १९१/७ एवढा होता. दिवसाअखेर ट्रेव्हिस हेड ६१ रनवर नाबाद आणि मिचेल स्टार्क ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.
या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहनं जलद बॉलिंग केली. जसप्रीत बुमराहच्या बॉलचा स्पीड ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरपेक्षाही जास्त होता. या मॅचमध्ये बुमराहनं एक बॉल १५३.२५ किमी प्रती तास या वेगानं टाकला. ऍडलेड टेस्टमधला हा सगळ्यात जलद बॉल होता. जसप्रीत बुमराह नेहमी सरासरी १४२ किमीच्या स्पीडनं बॉल टाकतो. पण या मॅचमध्ये त्याची सरासरी १४५ किमी एवढी होती.
जसप्रीत बुमराहनं या मॅचमध्ये २ विकेट घेतल्या आहेत. यातली पहिली विकेट पीटर हॅण्ड्सकॉम्बची होती. बुमराहच्या बॉलिंगवर हॅण्ड्सकॉम्बनं पंतला सोपा कॅच दिला. हॅण्ड्सकॉम्ब ३४ रन करून आऊट झाला. भारताची ही पाचवी विकेट होती. हॅण्ड्सकॉम्बची विकेट गेल्यानंतर कर्णधार विराट कोहलीही आनंदी दिसला.
यानंतर जसप्रीत बुमराहनं इनस्विंग बॉल टाकून पॅट कमिन्सला एलबीडब्ल्यू केलं. अंपायरनं आऊट दिल्यानंतर पॅट कमिन्सनं डीआरएस घेतला, पण थर्ड अंपायरनही कमिन्सचा डीआरएस फेटाळून लावला. ४७ बॉलमध्ये १० रन करून कमिन्स आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि पॅट कमिन्समध्ये ५० रनची पार्टनरशीप झाली होती.
भारताचा डाव २५० रनवर आटोपल्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया अजूनही ५९ रननी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशीही अशाच प्रकारे भेदक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर ऑल आऊट करण्याचं आव्हान भारतीय टीमपुढे असणार आहे.