बुमराहचा धमाका, श्रीलंकेत हे रेकॉर्ड्स केले नावावर
टीम इंडियाने रविवारी पाल्लेकेले मैदानात खेळलेल्या तिस-या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने भारतासमोर २१८ रन्सचे लक्ष्य दिले होते. ते टीम इंडियाने ४५.१ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून पूर्ण केले.
नवी दिल्ली : टीम इंडियाने रविवारी पाल्लेकेले मैदानात खेळलेल्या तिस-या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने भारतासमोर २१८ रन्सचे लक्ष्य दिले होते. ते टीम इंडियाने ४५.१ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून पूर्ण केले.
टीम इंडियाकडून रोहित शर्माने नाबाद १२४ रन्सची शतकी खेळी केली. तर महेंद्र सिंह धोनीने नाबाद ६७ रन्सची खेळी केली. या खेळाडूंसोबत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही कमाल केली आहे. त्याने त्याच्या नावावर या सामन्या दरम्यान अनेक रेकॉर्डही केले.
श्रीलंके विरूद्ध जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि करिअरमधील आतापर्यंत सर्वात चांगलं प्रदर्शन त्याने केलं. बुमराहने तिस-या वन-डेत १० ओव्हर्समध्ये केवळ २७ रन्स देऊन ५ विकेट घेतल्या. बुमराहच्या या गोलंदाजीमुळे टीम इंडियाने श्रीलंकेला २१७ रन्सवर रोखले. गेल्या दोन सामन्यांमध्ये बुमराहने जबरदस्त परफॉर्मन्स करत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
करिअरमध्ये पहिल्यांदा ५ विकेट :
जसप्रीत बुमराहने श्रीलंके विरोधात तिस-या वन-डे मध्ये आपल्या करिअरची सर्वात चांगली गोलंदाजी केली. इतकेच नाही तर त्याने पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या. बुमराहने श्रीलंकेच्या डिकवेला, मेंडिस, थिरिमाने, सिरिवर्डने आणि धनंजया यांच्या विकेट घेतल्या. बुमराहने याआधी कधीही एका सामन्यात ५ विकेट घेतल्या नव्हत्या.
तीन वर्षात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन :
जसप्रीत बुमराहने गेल्या तीन वर्षात सर्वात चांगले प्रदर्शन केले आहे. गेल्या तीन वर्षात टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाने वनडे मध्ये ५ विकेट घेतल्या नाहीत. मात्र, बुमराहने अफलातून प्रदर्शन करत केवळ त्याच्या करिअरचा नाही तर टीम इंडियातील गोलंदाजांपेक्षा सर्वात चांगला खेळ केला आहे. गेल्या सामन्यात बुमराहने ४ विकेट घेतल्या होत्या आणि आता या सीरीजमध्ये त्याच्या नावावर तीन सामन्यात ११ विकेट झाल्या आहेत. बुमराह २०१४ मध्ये बांगलादेश विरूद्ध स्टुअर्ट बिन्नी द्वारे ४ रन देऊन ६ विकेट घेतल्यानंतर वनडे मध्ये ५ विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
सर्वात जास्तवेळा ४ विकेट घेणारा भारतीय गोलंदाज :
जसप्रीत बुमराहने आत्तापर्यंत त्याच्या १९ वनडे सामन्यांमध्ये ४ वेळा ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड केलाय. बुमराह पहिल्या १९ सामन्यांमध्ये सर्वात जास्त ४ विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. सुरुवातीच्या १९ वनडे सामन्यांमध्ये बुमराहच्या नावावर ४ वेळा ४ विकेट घेण्याचा रेकॉर्ड झाला आहे. त्याआधी नरेंद्र हिरवानी, अजीत आगरकर आणि प्रविण कुमारने पहिल्या १९ सामन्यांमध्ये ३-३ वेळा ४ विकेट घेतल्या होत्या.
श्रीलंकेत लागोपाठ २ सामन्यांमध्ये ४ विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बुमराह :
श्रीलंके विरूद्ध जशाही बुमराहने ४ विकेट घेतल्या, तसाच तो श्रीलंकेत लागोपाठ २ सामन्यांमध्ये ४ विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी आशिष नेहराने श्रीलंकेत लागोपाठ २ सामन्यांमध्ये ४ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने श्रीलंकेविरुद्ध दुस-या वनडे सामन्यात ४ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर तिस-या सामन्यात त्याने ५ विकेट घेतल्या.
लागोपाठ २ सामन्यांमध्ये ४ विकेट घेणारा ९वा भारतीय गोलंदाज :
जसप्रीत बुमराह भारताकडून लागोपाठ २ सामन्यांमध्ये ४ विकेट घेणारा ९वा खेळाडू बनला आहे. त्याने यापूर्वी नरेंद्र हिरवानी, मनोज प्रभाकर, प्रवीण कुमार, आशिष नेहरा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांनीही लागोपाठ २ सामन्यांमध्ये ४ विकेट घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.