नवी दिल्ली : श्रीलंकेविरूद्ध कोलंबोमध्ये शेवटच्या वन डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट राखून विजय मिळवला. मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने एका स्पेशल कारची सवारी केली. आणि आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, धोनी कारचा किती क्रेझी आहे ते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ही कार सिरीजमध्ये जास्त विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला 'मॅन  ऑफ द सिरीज' मिळाल्यामुळे देण्यात आली आहे. जिंकल्यानंतर झालेल्या सेलिब्रेशनच्यावेळी धोनीने ही कार घेऊन पूर्ण ग्राऊंडमध्ये राऊंड मारली. यावेळी इतर टीम मेंबर्स देखील कारवर हजर होते. सगळ्यांनी एकत्र मिळून ही राईड एन्जॉय केली. 





श्रीलंका विरूद्ध इंडिया या सामन्यात नेमकं काय झालं? 
शेवटच्या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि संपू्र्ण टीम ४९.४ ओव्हरमध्ये २३८ रन्स करून ऑल आऊट झाली. श्रीलंकेची टीम एकावेळी ३ विकेटवर १८५ रन्स करून चांगल्या स्थितीमध्ये होती. मात्र त्यानंतर शेवटच्या ७ विकेटमध्ये फक्त ५३ रन्स करण्यात यश आलं. 


या टिममध्ये लाहिरू थिरिमाने (६७) एंजेलो मॅथ्यूज (५५) आणि उपुल थरंगा (४८) असे सर्वाधिक धावा केल्या. आणि भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमारने वनडे क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलिंगकरून ५/४२ अशा विकेट घेतल्या. बुमराहला २/४५ अशा विकेट मिळाल्या. त्यानंतर टीम इंडिया चांगली सुरूवात करू शकले नाही. २९ धावांमध्ये २ विकेट भारतीय संघाने गमावल्या होत्या. तिसऱ्या विकेटसाठी मनीष पांड्ये आणि विराट कोहलीने ९९ धावा काढून भारतीय संघाला संकटातून सावरलं. विराटने ११० धावा, केदारने ६७ धावा करून भारतीय संघाला ४६.३ ओवरमध्ये सामना आपल्या साईडला करून विजय प्राप्त केला.