150 kmph स्पीडने आलेल्या बॉलवर बुमराहने काय केलं पाहिलं का? रोहितची Reaction Viral
Jasprit Bumrah Reply On 150 kmph Delivery Rohit Sharma Smile: भारतीय संघातील अनेक फलंदाजांना या स्पर्धेत पहिल्यांदाच पॅड्स बांधून मैदानात उतरण्याची वेळ आली.
Jasprit Bumrah Reply On 150 kmph Delivery Rohit Sharma Smile: वर्ल्ड कप 2023 मधील भारताची विजयघौडदौड रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही सुरु ठेवण्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला यश आलं आहे. भारताने जग्गजेत्या इंग्लंडच्या संघावर 100 धावांनी मोठा विजय मिळवत यंदाच्या पर्वातील 6 वा सामना जिंकला. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना 229 धावांपर्यंत मजल मारता आली. कमी धावसंख्येमुळे सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा होता. मात्र 30 धावांवर बिनबादवरुन इंग्लंडचा डाव सर्वबाद 129 वर संपला.
फलंदाजीमध्येही चमकला बुमराह
भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी मोहम्मद शामीने घेतले. शामीने 4 इंग्लिश खेळाडूंना तंबूत पाठवलं. त्या खालोखाल जसप्रीत बुमराहने 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादवला 2 तर रविंद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. मात्र गोलंदाजीपूर्वी जसप्रीत बुमराहने फलंदाजीमध्येही आपली चुणूक दाखवली. बुमराहने मारलेला एक फटका पाहून संपूर्ण मैदानात जागेवर उभं राहिलं तर हा फटका पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेला कर्णधार रोहित शर्मालाही हसू अनावर झालं.
नेमकं घडलं काय?
जसप्रीत बुमराहने 25 चेंडूंमध्ये 16 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक चौकार लगावला. मात्र त्याने लगावलेला हा चौकार फारच खास ठरला. मुख्य गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मार्ग वूडच्या गोलंदाजीवर बुमराहने हा चौकार लगावला. त्यातही वूडने तब्बल 149.7 किलोमीटर वेगाने फेकलेल्या चेंडूवर बुमराहने हा खणखणीत चौकार लगावल्याने चाहत्यांनी एकच जल्लोष करत या अनपेक्षित चौकाराचं सेलिब्रेशन केलं. बुमराहचा हा चौकार पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या रोहित शर्मालाही हसू आलं. 46 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराहने हा चौकार लगावला. बुमराहने चौकार लगावल्यानंतर लखनऊच्या मैदानातील भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. रोहितचं हसणं, चाहत्यांचा जल्लोष आणि बुमराहचा चौकार असा तिहेरी योग जुळून आल्याचे क्षण कॅमेरामध्ये टीपले गेले.
जोडगोळीची गोलंदाजीत धमाल
गोलंदाजीमध्ये बुमराह आणि शामीच्या जोडगोळीने इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूत धाडण्याबरोबरच मधल्या फळीला सुरुंग लावला. इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या दोघांना कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाने चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांपैकी केवळ मोहम्मद सिराजला एकही विकेट घेता आली नाही. बाकी भारताच्या सर्व गोलंदाजांनी किमान एका गड्याला तरी बाद केलं. या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा डाव 34.5 ओव्हरमध्ये 129 वर आटोपला. इंग्लंडचा हा स्पर्धेतील 5 वा पराभव ठरला.