T20 World Cup 2024: वनडे वर्ल्डकपनंतर चाहते टी-20 वर्ल्डकपची वाट पाहत होते. टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय. लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला असून सुपर 8 मध्येही प्रवेश केलाय. लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये सर्वात मोठा सामना झाला तो भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये. हा सामना भारताने 6 रन्सने जिंकला. मात्र यावेळी सामन्याचा खरा हिरो ठरला तो जसप्रीत बुमराह. दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानी मुलींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. पाकिस्तानी मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पहिल्यादा चाहते खुशीत दिसतायत मात्र बुमराहच्या गोलंदाजीनंतर त्यांना रडू कोसळलंय.


पहिल्यांदा केलं सेलिब्रेशन मग...


भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट-रोहित फ्लॉप झाले आणि पाकिस्तानी टीमने आनंद साजरा कऱण्यात सुरुवात केली. त्यानतंर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने धावसंख्या 119 पर्यंत पोहोचवली. पाकिस्तानी टीमनेही भारताला ऑलआउट करून या सामन्यात इतिहास रचला. त्यानंतर हा सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला दिसत होता. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानी मुली उड्या मारताना आणि सेलिब्रेशन करताना दिसल्या. 



जसप्रीत बुमराहने आनंदावर फेरलं पाणी


120 रन्सच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने डाव चांगला सुरु केला होता. एका टोकाकडून विकेट पडत असतानाही रिझवानमुळे सामना पाकिस्तानच्या ताब्यात होता. पहिले 15 ओव्हर्स पाकिस्तान सामना जिंकणार असं चित्र होतं मात्र  16व्या षटकात आलेल्या बुमराहने रिझवानची विकेट्स घेतली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अखेर पाकिस्तानला शेवटच्या 6 बॉल्समध्ये 18 रन्सची गरज होती. अखेरीस टीम इंडियाने 6 रन्सने सामना जिंकला. सामना हरल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मुली नाराज आणि रडताना दिसल्या. त्यामुळे बुमराहमुळे या पाकिस्तानी चाहत्याचं 'मोए-मोए' पाहायला मिळालं.