T20 World Cup : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 2022 च्या टी20 विश्वचषकाला (T20 World Cup) मुकणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांनी दिली. गंभीर दुखापतीमुळे (injury) बुमराह (Jasprit Bumrah) वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या मोठ्या स्पर्धेमधून बाहेर पडल्यानंतर आता जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भाष्य केले आले आहे. बुमराहने ट्विट (Tweet) करून विश्वचषकातून बाहेर पडल्याबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. (Jasprit Bumrah reaction after being out of the World Cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 "यावेळेस मी टी20 विश्वचषकाचा भाग असणार नाही याचे मला दु:ख झाले आहे. पण माझ्या चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि समर्थनाबद्दल मी आभारी आहे. मी बरा होताच ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला पाठिंबा देईन," असे बुमराहने ट्विटमध्ये म्हटलं आहे.



बुमराहच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या खेळावर नक्कीच परिणाम होणार आहे. कारण डेथ ओव्हर्सची गोलंदाजी ही सध्या टीमसाठी सर्वात मोठी चिंता आहे. जसप्रीत बुमरावर नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy in Bengaluru उपचार सुरू असून बीसीसीआय त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत होती पण पुढील अनेक महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही हे निश्चित झाले आहे.