मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स सुत्रसंचालक संजना गणेशनन लवकरच त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहेत. जसप्रीत-संजना गोव्यात 14 मार्चला विवाह बंधनात अडकणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विवाह सोहळ्यात फक्त दोघांचे कुटुंब उपस्थित असणार आहेत. शिवाय विवाह सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत आणि संजनाच्या विवाह सोहळ्यात पाहुण्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी असणार आहे. अगदी मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत आणि खासगी पद्धतीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. जसप्रीत आणि संजनाच्या विवाह सोहळ्यात फक्त २० लोक त्यांना आर्शीवाद  देण्यासाठी हजेरी लावणार आहेत. दरम्यान, देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अगदी खास पाहुणे विवाह सोहळ्यात उपस्थित राहतील. 



गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत आणि संजनाच्या लग्नाच्या चर्चा तुफान रंगत होत्या. याप्रकरणी दोघांनीही मौन बाळगलं आहे. पण अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मीडियावर पोस्ट करत जसप्रीत आणि संजनाच्या विवाहाच्या बातमीला दुजोरा दिला.