डेब्यू मॅचमध्ये फ्लॉप ठरलेल्या सिराजबद्दल बुमराह म्हणतो..
ट्वेंटी २० आंतरराष्ट्रीय सामन्यापासून कारकिर्दीला सुरुवात करणारा मोहम्मद सिराज संघाला महाग पडला. त्याने चार ओव्हरमध्ये ५३ रन्स दिले.
नवी दिल्ली : न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा सामना भारताने गमावला. भारताच्या गोलंदाजांवर न्यूझीलंडचे बॅट्समॅन तुटून पडले. तसेच या दुसऱ्या ट्वेंटी २० आंतरराष्ट्रीय सामन्यापासून कारकिर्दीला सुरुवात करणारा मोहम्मद सिराज संघाला महाग पडला. त्याने चार ओव्हरमध्ये ५३ रन्स दिले.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सिराजबद्दल एक विधान केले आहे.
सिराज हा आपल्या चुकांमधून शिकत राहिल आणि भविष्यात चांगली कामगिरी करेल असा विश्वास बुमराहने व्यक्त केला. तेवीस वर्षाच्या सिराजला मॅचमधील दुसरी ओव्हर देण्यात आली होती त्याने चार ओव्हरमध्ये ५३ रन्स देत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा विकेट घेतला.
बुमराह म्हणाला, 'ठीक आहे, हा त्याचा पहिला सामना होता. एका कठीण विकेटवर गोलंदाजी करणे कधीच सोपे नसते. सिराज टीममध्ये नवा आहे, म्हणून गोलंदाजांच्या सर्कलमध्ये यायला थोडा वेळ घेईल.'