Jay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Jay Shah ICC : लवकरच अमित शाहांचा पुत्र जय शाह आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार आहेत. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवीन अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपणार आहे. महत्त्वाच म्हणजे ग्रेग बार्कले यांनी दोन टीम कारभार सांभाळल्यानंतर तिसऱ्या टर्मसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आयसीसीचे पुढील चेअरमन म्हणून बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. तर म्हणजेच 1 डिसेंबरपासून नवे अध्यक्ष आयसीसीचा पदभार स्वीकारतील सांभाळणार आहे. (Jay Shah will be the new ICC chairman Announcement will be made soon)
2 मोठ्या क्रिकेट बोर्डाचा जय शाह यांना पाठिंबा!
अजून जय शाह यांनी या पदासाठी अर्ज केला नाही, पण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शाह यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे जय शाह यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
जय शाह यांनी 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद भूषवलं. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी घेतला. नंतर सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले आणि आता ते बीसीसीआचे अध्यक्ष आहेत.
तर जय शाह यांची निवड आयसीसी अध्यक्षपदी निवड केली तर लहान वयात हा अध्यक्ष बनून ते इतिहास रचणार. जय शाहच वय 35 वर्ष आहे. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत, ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलंय. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष राहू शकते. आयसीसी अध्यक्ष पदाचा कारभार तीन वर्षांचा असतो.