आणखी एक क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याचे फोटो केले शेअर
सौराष्ट्रला पहिला रणजी खिताब जिंकवून दिल्यानंतर केला साखरपुडा.
मुंबई : सौराष्ट्रला पहिला रणजी खिताब जिंकवून दिल्यानंतर २ दिवसातच कर्णधार जयदेव उनादकट याचा साखरपुडा झाला आहे. पोरबंदरच्या या 28 वर्षीय गोलंदाजाने त्याची होणारी पत्नी रिन्नी सोबतचे फोटो शेअर केले आहेत.
जयदेव उनादकटने आपल्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी दिली आहे. ‘सहा तास, दोन वेळचं जेवण आणि एक मड केक.’ असं कॅप्शन त्याने दिले आहे.
भारतीय टेस्ट खेळाडू आणि सौराष्ट्रसाठी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘परिवारात स्वागत आहे रिन्नी. मला आनंद आहे की, उनादकटला त्याचं प्रेम मिळालं.'
पंजाबचा फास्ट बॉलर सिद्धार्थ कौल, हरफनमौला मनदीप सिंह आणि विदर्भाचा फैज फजलने देखील उनादकटला शुभेच्छा दिल्या आहेत.