ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू जेस जोनासेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकेट घेतल्यावर तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या स्टाईलने सेलिब्रन केले. ऑस्ट्रेलियाची जोनासेन ही महिला कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळत आहे. इथे ती ट्रिनबागो नाइट राइडर्स या टीमचा भाग असून स्पर्धेचा दुसरा सामना हा 22 ऑगस्ट रोजी ट्रिनबागो नाइट राइडर्स विरुद्ध बारबाडोस रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. दरम्यान जोनासेनने विरुद्ध टीमच्या आलिया एलेने (11) हिला बोल्ड केले. विकेट मिळाल्यावर ती खूप आनंदीत झाली आणि तिने शाहरुख खानची सिग्नेचर पोज देत सेलिब्रेशन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रिनबागो नाइट राइडर्स विरुद्ध बारबाडोस रॉयल्स यांच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास बारबाडोस रॉयल्स हा सामना जिंकला. तरौबामध्ये टॉस हरल्यामुळे ट्रिनबागो नाइट राइडर्स पहिल्यांदा गोलंदाजीची मैदानात उतरली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 113 धावा केल्या. विरुद्ध टीमने 114 धावांचे टार्गेट दिल्यावर बारबाडोस रॉयल्सने 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून विजयाचे आव्हान सहज पूर्ण केले. सामन्यादरम्यान बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने दमदार फलंदाजी केली. डावाची सुरुवात करताना तिने आपल्या संघासाठी 56 बॉलमध्ये 12 चौकारांच्या मदतीने 67 धावा ठोकून नाबाद अर्धशतक झळकावले आणि तिने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 



जेस जोनासेनचे प्रदर्शन :


ट्रिनबागो नाइट राइडर्स विरुद्ध बारबाडोस रॉयल्स सामन्यात फलंदाजी करताना जेस जोनासेन फ्लॉप ठरली. मात्र गोलंदाजी दरम्यान तिने 4 ओव्हर टाकून 21 धावा देत 2 विकेट्स घेतले.