गोल्ड कोस्ट : २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताची सुरुवात दमदार झालीये. वेटलिफ्टिंगमध्ये प्रदीप सिंगने रौप्य पदक जिंकल्यानंतर नेमबाजपटू जीतू रायने १० मीटर एअर पिस्टोल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलेय. याच प्रकारात ओम मिथरवालने कांस्यपदक जिंकलेय. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ सुवर्णपदके मिळालीत. बेलमोंट शूटिंग सेटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जीतून रायने सुवर्णपदाकाची कमाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीतूने फायनरलमध्ये एकूण २३५.१ गुण मिळवले. यासोबतच त्याने नवा रेकॉर्डही केला. मिथारवालने २१४.३ गुणांसह कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेतील रौप्य पदक ऑस्ट्रेलियाच्या कॅरी बेलने मिळवले. त्याने २३३.५ गुण मिळवले. 


प्रदीप सिंगला रौप्यपदक


ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकावलेय. प्रदीप सिंगने १०५ किलो वजनी गटात रौप्य कामगिरी साधली. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची कमाई झाली. प्रदीपने १५२ किलो स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये २०० किलोसह एकूण ३५२ किलो वजन लिफ्ट केले. 



यासोबतच भारताच्या खात्यात १५ पदकांची कमाई झालीये. यात ८ सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकाचा समावेश आहे.