मुंबईसाठी शेवटचा सामना खेळणार का जोफ्रा आर्चर?
मुंबईसाठी शेवटचा सामना खेळणार जोफ्रा आर्चर? पाहा व्हायरल होत असलेल्या फोटोमागचं सत्य
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मुंबईने 8 कोटी देऊन टीममध्ये समाविष्ट केलं होतं. पण दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर आयपीएलचे सामने खेळू शकला नाही. मात्र तरीही जोफ्रा आर्चरवर मुंबईने पैसे लावले आणि त्याला टीममध्ये घेतलं.
मुंबई टीमची कामगिरी आयपीएलमध्ये चांगली राहिली नाही. मुंबईने 13 पैकी 10 सामने गमवले आहेत. मुंबई गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही आयपीएलच्या प्लेऑफ स्पर्धेतून बाहेर झाली आहे. मुंबईच्या शेवटच्या सामन्याआधी टीमने खास हिंट दिली आहे.
जोफ्रा आर्चर शेवटच्या सामन्यात खेळणार का? अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. जोफ्रा आर्चरच्या जर्सी आणि किटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जोफ्रा आर्चर मुंबईची शेवटची मॅच खेळण्याची शक्यता असल्याची एक हिंट यामध्ये देण्यात आल्याची चर्चा आहे.
हा फोटोच केवळ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र प्रत्यक्षात तो शेवटचा सामना खेळणार नाही. मात्र 2023 मध्ये जोफ्रा आर्चर पुन्हा मुंबई टीमकडून खेळू शकतो अशी चर्चा आहे. जसप्रीत बुमराहसोबत जोफ्रा आर्चर 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे असे संकते मिळत आहेत.
जोफ्रा आर्चरला त्यासाठी मुंबईने पूर्ण किट पाठवलं आहे. तो आता शेवटच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप अजून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही. तर दुसरीकडे 2023 मध्ये आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चर मुंबईकडून खेळताना दिसू शकतो.