IPL मेगा ऑक्शनमध्ये अचानक झाली घातक गोलंदाजाची एंट्री, तब्बल 25 कोटींची लागू शकते बोली
IPL 2025 Mega Auction : 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे दोन दिवस ऑक्शन होणार असून यापूर्वी आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे.
IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी (IPL 2025 Mega Auction) आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे दोन दिवस ऑक्शन होणार असून यापूर्वी आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आता आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी मेगा ऑक्शनमध्ये बोली लावण्यात येणाऱ्या 574 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आलेली होती, मात्र त्यात जोफ्रा आर्चरचे नावच नव्हते. पण ऑक्शनच्या काही दिवसांपूर्वीच जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) ईसीबीकडून एनओसी मिळालेली आहे त्यामुळे आता त्याचा मेगा ऑक्शनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
रिपोर्टनुसार इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून आयपीएलसाठी एनओसी मिळत नव्हतो त्यामुळे तो नाराज होता. आर्चर हा ईसीबीच्या मुख्य रणनीतीचा भाग असल्याने त्याला एनओसी देण्यात येत नव्हती, बोर्डाला त्याच्याबाबत कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. मात्र आयपीएलपूर्वी लावण्यात आलेल्या काही नियमांमुळे जोफ्रा आर्चर नाराज असल्याने अखेर ईसीबीने त्याला एनओसी दिली.
बीसीसीआयने आयपीएल 2025 बाबत केले काही खास नियम :
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयपीएलच्या आगामी सीजनपूर्वी काही विशेष नियम बनवले आहेत. यापैकी एक नियम असा आहे की जो खेळाडू यापूर्वी आयपीएलचा भाग राहिला आहे. त्या खेळाडूने आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सहभाग घेतला नाही तर त्याच्यवर पुढील सीजनमध्ये बंदी घालण्यात येईल ज्यामुळे त्याला 2027 पूर्वी आयपीएल सीजनमध्ये सहभागी होता येणार नाही. अनेक विदेशी खेळाडू मेगा ऑक्शनचा भाग होत नाहीत आणि मिनी ऑक्शनमध्ये येऊन मोठी रक्कम घेऊन जातात. त्यामुळे बीसीसीआयने असे होऊ नये याकरता हा नियम बनवलेला आहे. त्यामुळेच आर्चर ईसीबी त्याला आयपीएल खेळण्यासाठी एनओसी न देत असल्याने तो नाराज होता. कारण त्याला याची चिंता होती की जर तो मेगा ऑक्शनचा भाग राहिला नाही तर त्याला पुढचा आयपीएल सीजन सुद्धा खेळता येणार नाहीत.
जोफ्रा आर्चरवर लागेल मोठी बोली :
जोफ्रा आर्चरची आयपीएल 2025 मध्ये अचानक एंट्री झाल्यामुळे आता मेगा ऑक्शनमध्ये सर्वांची नजर त्याच्यावर असेल. जोफ्रा आर्चर हा आयपीएल 2025 चा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. याच कारण म्हणजे जोफ्रा आर्चर हा घातक गोलंदाजी सह खालच्या क्रमात दमदार फलंदाजी करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. लीगमध्ये त्याने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त सामाने खेळले असून यात त्याने 48 विकेट्स घेतलेत. तर फलंदाजी करताना त्याने 25 इनिंगमध्ये 199 धावा सुद्धा केल्या आहेत. यात 11 चौकार आणि 14 षटकारांचा समावेश आहे. यापूर्वी आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शन ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कवर 24.75 कोटींची बोली लागली होती. मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.