केपटाऊन : दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला झटका देत हरफनमौला जीन पॉल ड्युमिनीनं एक मोठा निर्णय घेतलाय. ड्युमिनीनं टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं शनिवारी ड्युमिनीच्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली. परंतु, ड्युमिनी वनडे आणि टी-२० मध्ये आपलं करिअर पुढे सुरूच ठेवणार आहे. 


यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजनंतर ड्युमिनीला दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून हटवण्यात आलं होतं. 


आपल्या करिअरमध्ये ४६ मॅचमध्ये ड्युमिनीनं २०१३ रन्स बनवले आणि ४२ विकेट घेतले. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात ड्युमिनीनं आपल्या टेस्ट करिअरमध्ये पाऊल टाकलं होतं... आणि पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक ठोकून आपल्या नावाचा दबदबाही निर्माण केला होता.