मुंबई : क्रिकेट सिरीजसाठी टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माप्रमाणे अनेक क्रिकेटर्स आपल्या पत्नीसमवेत इंग्लंडला रवाना झाले आहेत. मॅचशिवाय या सेलिब्रेटी जोड्यांच्या ट्रिपचे फोटोजही सध्या चर्चेत आहेत. आता या लाईमलाईटमध्ये देशाचा 'एलिजिबल बॅचलर' केएल राहूल देखील आहे. लंडनमध्ये राहूल एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत असल्याचे बोलले जात आहे.


या अभिनेत्रीला करतोय डेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्नुसार, के एल राहूल आणि मुन्ना मायकल सिनेमाची अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनाही रेस्टोरंटमध्ये एकत्र लंच करताना स्पॉट करण्यात आले आहे. इतकंच नाही तर मॅच पाहण्यासाठी निधी स्टेडियममध्येही गेली होती आणि क्रिकेटर्संना चिअरअप करतानाही दिसली.


अफेअर्सच्या चर्चांना उधाण


निधी अग्रवाल सध्या लंडनमध्ये दक्षिण भारतीय सिनेमाच्या शूटिंगसाठी गेली आहे. निधी आणि राहुलच्या अफेअरची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. दोघांना मुंबईतील रेस्टोरंटमध्येही एकत्र स्पॉट करण्यात आले होते. पण आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत, असे दोघांचेही म्हणणे आहे.



यावर निधी म्हणते...


एका मुलाखतीत निधीने सांगितले की, केएल राहूलला ती खूप वर्षांपासून ओळखते. जेव्हा ती अभिनेत्री नव्हती आणि राहुल किक्रेटर नव्हता तेव्हापासून त्यांची ओळख आहे. त्यांची पहिली भेट बंगळूर येथे झाली होती.