Ind vs Ban : टी-20 विश्वचषकामध्ये भारत आणि बांगलादेशमधील सामन्यात भारताच्या 185 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने धमाकेदार सुरूवात केली होती. मात्र 7 ओव्हरनंतर पाऊस आल्यामुळे सामना थांबवला गेला होता. बांगलादेशने 7 ओव्हरमध्ये 66 धावा केल्या होत्या, सामना सुरू झाल्यानंतर बांगलादेशला 151 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशने एकही गडी गमावला नव्हता सलामीवीर लिट्टन दासने 60 धावा केल्या होत्या. दासच्या वादळासमोर भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडाली होती. मात्र पुन्हा सामना चालू झाल्यावर आर. आश्विनच्या पहिल्याच चेंडूवर दास बाद झाला. के. एल. राहुलने केलेल्या डायरेक्ट थ्रोवर दास बाद झाला. राहुलचा हा थ्रो मॅचविनिंग ठरला आहे. 



लिट्टन दास बाद झाल्यामुळे भारतीय संघाला वापसी करता आली. बांगलादेशच्या चार विकेट्स गेल्या आहेत. मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंहने भारताला यश मिळवून दिलं. पाऊस आल्यामुळे सामना भारताच्या पारड्यामध्ये आला म्हणा येईल. बांगलादेशने 7 ओव्हरमध्ये 66 धावा केल्या होत्या आणि पाऊस झाल्यानंतर बांगलादेशच्या विकेट्स गेल्या. 


दरम्यान, अंतिम षटकात भारताला 20 धावांची गरज होती, युवा अर्शदीपने मोठ्या हिमतीने हे षटक टाकत भारताचा विजय निश्चित केला आहे. या सामन्यामध्ये भारताने 5 धावांनी विजय मिळवला आहे.