ज्याच्या वेगाने थरथर कापायचे कांगारू, लिलावादरम्यान लपून बसला होता वॉशरुममध्ये
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.
मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.
कांगारुही थरथर कापायचे
त्याच्या १४९ किमी वेगाने बॉल टाकण्याच्या खुबीने त्याला रातोरात प्रसिद्ध केले. अंडर १९ वर्ल्डककपमधील पहिल्या सामन्यात कमलेश नागरकोटीच्या तुफानी गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियन फलंदााजंची त्रेधातिरपीट उडाली होती. २७ आणि २८ जानेवारीमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात कमलेशचेही नाव होते.
अधिक वाचा - उधार बॅट घेऊन खेळायचा क्रिकेटर, एका झटक्यात बनला करोड़पती
आयपीएलमध्ये अंडर १९ मधील महागडा खेळाडू
कमलेश नागरकोटी यंदाच्या आयपीएलमधील अंडर १९ खेळाडूंपैकी सर्वात महागडा क्रिकेटर ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ३ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतले. अंडर १९मधील आणखी एक क्रिकेटर शिवम मावीलाही केकेआरने खरेदी केले. कमलेश आता तुफानी गोलंदाजीची जादू आयपीएलमध्ये दाखवणार आहे.
लिलावादरम्यान नर्व्हस झाला
दरम्यान, बोली सुरु असताना नागरकोटी खूप नर्व्हस होता. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, कमलेश सध्या टीमसोबत न्यूझीलंडमध्ये आहे. कमलेशने सांगितले, मी लिलाव नाही पाहिला. जेव्हा लिलाव सुरु होता तेव्हा माझे मित्र मला फोन करत होते. मात्र मी फोन घेतला नाही. मी थोडा नर्व्हस होतो. जेव्हा माझा रुमपार्टनर पंकजने लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यास सुरुवात केली तेव्हा मी तिथून उठून गेलो. मी बराच वेळ वॉशरुममध्ये जाऊन बसलो होतो. जेव्हा मी वॉशरुमबाहेर आलो तेव्हा माझ्या नावावर बोली लावण्यात आली होती.
राजस्थानच्या बडमेरचा रहिवासी असेलला कमलेश अंडर १४, अंडर १६ आणि अंडर १९मध्ये राजस्थानकडून खेळलाय.