मेक्सिको : नागपूरच्या कांचनमाला पांडे हिनं मेक्सिको इथं सुरू असलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली असून तिची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कांचनमालानं एस-११ श्रेणीत २०० मीटर इंडीव्युजल मिडले प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.  


कांचनमाला ही भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू आहे. या स्पर्धेतील इतर प्रकारात तिला थोडक्यात अपयश आलं. 


कांचनमाला ही जन्मत: अंध असून ती मूळची अमरावतीची आहे. तिनं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरवले आहेत. 


तिनं जवळपास १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व केलं असून दहाहून अधिक सुवर्णपदक आणि पाच रौप्य पदकांना तिनं गवसणी घातली आहे.