PAK vs NZ : ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचे आता केवळ दोनच सामने उरले आहेत. आजच्या दिवशी पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड अशी पहिली सेमीफायनल खेळली गेली. या सामन्यामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलचं तिकीट पटकावलं आहे. दरम्यान या पराभवामुळे केन विलियम्सन आणि त्याच्या टीमचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान या सामन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये केन विलियम्सन रागाने लालबूंद झालेला दिसतोय.


फलंदाजी करताना संतापला Kane Williamson


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज हारिस रौफ गोलंदाजी करत होता. केन विलियम्सनने ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर हॅरिसने रन पूर्ण करताच बोट दाखवून आपली नाराजी दाखवली. काही नंतर लक्षात आलं की, साइट स्क्रीनवर होणाऱ्या गोष्टींवर तो नाखूष दिसत होता.



केन संतापल्यामुळे अंपायरने काही काळ सामना थांबवला होता. दरम्यान सामना काही काळासाठी थांबवला गेल्यानंतरही पुन्हा केनला साइट स्क्रीनमध्ये काही हालचाल जाणवली आणि पुन्हा एकदा खेळ थांबवला गेला. बाबर आझमही अशाप्रकारे वारंवार खेळ थांबल्यामुळे वाया जाणारा वेळ पाहून अंपायरकडे तक्रार करण्यासाठी गेला. यानंतर अंपायरने योग्य तो निर्णय घेतला, मात्र यावेळी पुन्हा एकदा केन विलियम्सनचं रौद्र रूप पाहायला मिळालं.


सामन्यानंतर काय म्हणाला केन?


सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवनंतर केन निराश दिसला. तो म्हणाला, आमच्या फार लवकर दबाव टाकला गेला. आमच्या फलंदाजीनंतर आम्ही विचार करत होतो की, हा एक फायटींग टोटल असेल. विकेट याठिकाणी थोडी कठीण होती. पाकिस्तानकडून आम्ही जास्त मेहनत करूवून न घेतल्याने आम्ही नाराज आहोत. हा पराभव पचवणं फार कठीण आहे.


बाबर आणि रिझवानने आमच्यावर दबाव तयार केला. खरं सांगायचं तर, पाकिस्तान विजेता होण्याचा पात्र आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं गेलं. संपूर्ण राऊंड रॉबिनमध्ये आम्ही चांगला खेळ केला. आज आम्ही आमचा बेस्ट देऊ शकलो नाही."


न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये पराभव


सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानने तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयामुळे पाकिस्तानने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला 153 रन्सचं आव्हान दिलं होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने हे आव्हान पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला. 


रिझवान-बाबर जोडीने खेचून आणला विजय


पाकिस्तानने फलंदाजीला चांगली सुरुवात केली. ओपनर बाबर आणि रिझवान यांना उत्तम खेळी करत अर्धशतकं ठोकली. 53 रन्सवर बाबर माघारी परतल्यावरही रिझवावने त्याचा खेळ सुरु ठेवला. मोहम्मद हॅरिसनेही त्याला 30 रन्सची साथ देत विजय खेचून आणला. अखेर 3 विकेट्स गमावत पाकिस्तानने 19.1 ओव्हरमध्ये 153 रन्सचं लक्ष्य पूर्ण करत न्यूझीलंडचा पराभव केला.