IPL 2023: क्रिकेटप्रेमी ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आलाच. आजपासून आयपीएलला सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यामध्ये केन विलियम्सनला (Kane Williamson) दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. केन व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2023 च्या 16 व्या सिझनमधील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जातोय.  मात्र या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यासह केन विलियम्सनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येतेय. फिल्डींग करताना केनला दुखापत झाली आहे.


Kane Williamson कशी झाली दुखापत


टॉस जिंकून हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी 13 व्या ओव्हरमध्ये जोशुआ लिटल गोलंदाजी करत होता.  या वेळी ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर गायकवाडने मोछठा शॉट खेळला. यावेली बाऊंड्री लाईनजवळ केन विलियम्सन उभा होता. उडी मारून केनने बॉल पकडला खरा. मात्र बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर केनने बॉल फेकला. 



उडी मारून खाली आल्यानंतर त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली. यावेळी तातडीने तपासणी करण्यासाठी फिजिओला बोलावण्यात आलं. यावेळी केन वेदनेने कळवळत होता. इतकंच नाही तर दोन खेळाडूंनी केनला ड्रेसिंग रूममध्ये नेलं. त्यामुळे आता केनची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुढच्या सामन्यात खेळणार का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.


जिंकण्यासाठी 179 रन्सचं आव्हान


चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हर्समध्ये 178 रन्स केले. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने बॅट चांगलीच तळपली. तर शेवटच्या षटकामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने दोन उत्तम फटके लगावत चाहत्यांची मनं जिंकली. या सामन्यामध्ये ऋतुराज 92 रन्सनवर बाद झाला. ऋतुराजने 9 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 50 बॉल्समध्ये या 92 रन्स केले.