मुंबई : केन विलियम्सनची सनरायझर्स हैदराबाद पुन्हा एकदा पराभवाच्या वाटेवर आली आहे. काल दिल्लीकडून झालेल्या सामन्यात हैदराबादला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. 5 विजय मिळवल्यानंतर हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. दिल्लीकडून देण्यात आलेल्या 208 रन्सच्या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादला केवळ 186 रन्स करता आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या सामन्यात हैदराबादला 21 रन्सने पराभव स्विकारावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर एसआरएचचा कर्णधार केन विलियम्सनने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर केन विलियम्सन म्हणाला, दिल्ली कॅपिटल्सने चांगली फलंदाजी केली. मैदान छोटं होतं आणि दवंही होतं. आमच्या विकेट्स शिल्लक राहिल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती. आम्ही त्यांना दबाव निर्माण करण्याची संधी दिली.


डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल या दोघांनीही चांगली शानदार खेळी केली. सर्वांसाठी शिकण्याची उत्तम संधी, उमरान आमच्या टीममध्ये एक उत्तम भर घालतोय. जर आपण गोष्टी एकत्र ठेवल्या तर खूप लवकर बदलू शकतात. दिल्लीच्या मधल्या फळीने शानदार फलंदाजी केली आहे. आमच्या टीममधील पूरन आणि मरकम आणि इतरंही चांगली कामगिरी करत आहेत, मी फक्त टीमसाठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं केनने म्हटलं आहे.