Kane Williamson : शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशाचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ( Kane Williamson ) कॅप्टन्स इंनिग खेळली. यावेळी केन विलियम्सनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. दरम्यान सामना संपल्यानंतर केनने किवींच्या टीमचं कौतुक केलंय.


टीमच्या प्रदर्शनावर केन विलियम्सन खूश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशचा न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून पराभव केल्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने ( Kane Williamson ) आपल्या खेळाडूंचं कौतुक केलंय. तो म्हणाला, “आमच्या टीमकडून खरोखरच चांगली कामगिरी झाली. लॉकीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. यासोबतच मिशेलने मोठं योगदान दिलं आहे. तो टीमतील पहिला व्यक्ती आहे. त्याला खेळ पाहून खूप छान वाटलं."


Kane Williamson ने खेळी 78 रन्सची खेळी


कर्णधार केन विल्यमसनने ( Kane Williamson ) वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना खेळताना बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ओपनर रचिन रवींद्र 9 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला असताना तो फलंदाजीला आला. विलियम्सनने या सामन्यात 107 बॉल्सचा सामना करत 78 रन्सची खेळी केली. या खेळीत 8 फोर आणि 1 सिक्स लगवाली होता. यावेळी बोटाला दुखापत झाल्याने तो रिटायर्ड हर्ट होत पव्हेलियनमध्ये परतला. 


न्यूझीलंडच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर


यंदाच्या वर्ल्डकपमध्ये साऊथ आफ्रिकेचा खेळही चांगला होताना दिसतोय. साऊथ अफ्रिकेने दोन दमदार विजयाच्या जोरावर 2.360 गुणांच्या जोरावर अव्वल स्थान मिळवलं होतं. मात्र आता न्यूझीलंडने तिसरा विजय मिळवत 6 अंक कमावले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने पॉईंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय.  तर साऊथ अफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर घसरगुंडी झालीये. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानी भारताचा क्रमांक आहे.


भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणार महामुकाबला


वर्ल्डकप स्पर्धेत सलग दोन विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सज्ज झालीये. भारत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) दोन हात करणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे.