Kane Williamson, World Cup 2023 : वर्ल्ड कपमधील न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात (NZ vs BAN) शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सामना रंगला होता. या सामन्यात किवींनी बांगलादेशाचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) कॅप्टन्स इंनिग खेळली. केनच्या या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडला तिसरा विजय मिळवता आला आहे. अशातच आता न्यूझीलंडसाठी 'गड तर आला पण...' त्यांच्या म्होरक्या म्हणजेच न्यूझीलंडचा सिंह केन विलियम्सन जखमी झाल्याचं समोर आलं आहे. बांगलादेशच्या एका थ्रोवेळी केनच्या हाताला बॉल लागला अन् हाताला फ्रॅक्चर झाल्याची शंका उपस्थित होत होती. अशातच आता एक्स रे रिपोर्ट समोर आला असून न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केन विलियम्सनच्या एक्स रे रिपोर्टमधून डाव्या अंगठ्याला अविस्थापित फ्रॅक्चरची पुष्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंड क्रिकेटने अधिकृत माहिती दिली. मात्र, तो वर्ल्ड कप स्कॉडमध्ये कायम राहणार असल्याचं देखील न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. पुढील महिन्यात तो बॅकअपसाठी असणार असल्याचं किवी बोर्डाने सांगितलंय. केनच्या दुखापतीनंतर आता टॉम ब्लंडेल भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. 


नेमकं काय झालं?


न्यूझीलंडच्या इंनिंगमधील 39 व्या ओव्हरमध्ये केन विलियम्सन अर्धशतक ठोकून फलंदाजी करत होता. त्यावेळी मुस्तफिझूर रहमानचा बॉल त्याच्या बोटाला लागला. दुखापतग्रस्त झाल्याने तो रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला. त्याने 107  चेंडूत 78 धावा केल्या. त्यानंतर बाकीच्या खेळाडूंनी केनचं उर्वरित काम पूर्ण केलं. केन पुन्हा मैदानात येणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, आता सर्वांच्या पदरी निराशा आल्याचं समोर आलं आहे.



दरम्यान, कर्णधार केन विल्यमसनने ( Kane Williamson ) वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना खेळताना बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ओपनर रचिन रवींद्र 9 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला असताना तो फलंदाजीला आला. विलियम्सनने या सामन्यात 107 बॉल्सचा सामना करत 78 रन्सची खेळी केली. या खेळीत 8 फोर आणि 1 सिक्स लगवाली होता. यावेळी बोटाला दुखापत झाल्याने तो रिटायर्ड हर्ट होत पव्हेलियनमध्ये परतला.