मोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इंस्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, `आंदोलनात तीने...`
Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat: कंगना रणौटने विनेश फोगाटसाठी एक पोस्ट केली आहे. यात तिने विनेशला तिच्या खेळाबद्दल कौतुक केलं आहे त्याचबरोबर एक टोलाही लगावला आहे.
Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकच्या 11 व्या दिवशी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कुस्तीपटू विनाश फोगटने फायनलमध्ये धडक देत भारतीयांना खूप आनंदाची बातमी दिली आहे. अंतिम फेरीत प्रवेश करुन विनेश फोगाटने पदक निश्चित केले आहेत. भारतीयांना आता विनेशकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. विनेश फोगाटच्या या ऐतिहासिक कामगिरीवर समस्त भारतीयांकडून अभिनंदन केले जात आहे.मंडीची खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौटनेदेखील विनेशचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर टोलादेखील लगावला आहे. कंगनाची इन्स्टास्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने म्हटलं आहे की, 'भारताला पहिलं गोल्ड मिळेल यासाठी प्रार्थना करते. विनेश फोगाट हिने एके काळी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी तिने म्हटलं होतं की, 'मोदी तेरी कब्र खुदेगी'. त्यानंतरही विनेग फोगाटला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांना बेस्ट ट्रेनिंग, कोच आणि सोयी मिळाल्या. हेच लोकशाही आणि उत्तम लीडर असल्याची पावती आहे.' कंगनाच्या या इन्स्टापोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सोशल मीडियावरही ही पोस्ट व्हायरल होतेय.
काय आहे प्रकरण?
29 वर्षांच्या विनेश फोगाटने मागील वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण सिंह शरण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करत अनेक दिवस कुस्तीपासूनही दूर होती. मात्र, आता विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. विनेश पहिल्यांदा 50 किलोच्या वजनी गटासाठी खेळली आहे. यापूर्वी ती 53 किलो वजनी गटातून खेळत होती.
ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट ही भारतातील पहिली कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळं एकप्रकारे विनेशने इतिहास रचला आहे. मंगळवारी तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 ने पराभव केला. आज विनेशचा फायनलचा सामना होणार आहे.
फोगटने क्वार्टर फायनल फेरीत उत्तम विजय मिळवला होता. तिने युक्रेनच्या ओस्काना लिवाचचा 7-5 असा पराभव केला. विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये विद्यमान चॅम्पियन जपानच्या सुसाई युईचा पराभव केला होता. विनेशने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती. याआधी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.