मुंबई: भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार आणि महान ऑलराऊंडर म्हणून आजही कपिल देव यांचं नाव घेतलं जातं. कपिल देव अत्यंत संघर्ष करून आज इथपर्यंत पोहोचले आहेत. छोट्या संकटांना घाबरून अनेकदा आयुष्य संपवण्यापर्यंत पावलं उचलली जातात. कपिल देव यांनी सगळ्या संकटांना मोठ्या हिंमतीनं तोंड दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारण 1970मधील घटना असेल जेव्हा कपिल देव अंडर 19 कॅम्पसाठी मुंबईमध्ये आले होते. सरावानंतर ते जेव्हा जेवायला बसले तेव्हा त्यांना डाळ-भाजी आणि दोन पोळ्या जेवणात मिळाल्या. त्यांनी तिथल्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली. त्यावेळी वेगवान गोलंदाजीसाठी एवढं खाणं पुरेसं नाही अजून थोडं जेवण वाढवून देण्याची विनंती केली होती. 


कपिल देव यांनी मॅनेजरला विनंती केली की ते वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना अजून चांगल्या डाएटची आवश्यकता आहे. त्यावेळी केकी तारापोर यांनी सांगितलं की भारतात फास्ट बॉलर नाहीच आहेत. त्यानंतर कपिल देव यांनी ही गोष्ट कायम डोक्यात ठेवून आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. 


वेगवान गोलंदाजीमध्ये कपिल देव यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील त्यांनी केला आहे. भारतात वेगवान गोलंदाज नाहीत हा भ्रम त्यांनी आपल्या कामगिरीतून दूर केला. 


असं म्हणतात की कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटमधील फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचा ट्रेंड सुरू केला होता. कपिल देव तंदुस्त राहण्याकडे फार लक्ष्य देत होते. इतकच नाही तर खूप जास्त वेगाने धावायचे.  माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी म्हणाले की, 'कपिल देव हे जर क्रिकेटपटू नसते तर 100 मीटर शर्यतीत ते नक्कीच विजयी ठरले असते. त्यांनी कोणताही गोलंदाजाला इतक्या वेगाने धावताना पाहिले नाही. ते तुमच्याजवळून जातील आणि तुम्हालाही समजणारही नाही इतक्या वेगानं ते धावत जातात.' 


कपिल देव यांची शेवटपर्यंत आपली कामगिरी तेवढीच उत्तम आणि जबरदस्त ठेवली होती. झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी 17 धावा देऊन 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. फलंदाजीदरम्यान 175 धावा त्याने केल्या होत्या.