Kapil Dev kidnapped : क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त 10 दिवस बाकी आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी टीम इंडिया (Indian cricket team) तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. 1983 साली कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव (Kapil Dev kidnapped) यांची किडनॅपिंग झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि समालोचक गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक क्लिप शेअर केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण कपिल देव यांच्या किडनॅपिंगचा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर याची क्लिप सध्या तुफान व्हायरल होत असून नेमकं काय झालंय? यावर सर्वांना चिंता लागून राहिलीये. गौतम गंभीरने व्हिडीओ शेअर करत वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Gautam Gambhir ?


इतर कोणाला ही क्लिप मिळाली आहे का? आशा आहे की व्हिडीओमध्ये दिसतात ते प्रत्यक्षात कपिल पाजी नसावेत आणि कपिल पाजी ठीक आहे, अशी आशा आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. गंभीरच्या या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.


पाहा Video



दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? असा सवाल विचारला जातोय. हा व्हिडीओ एका जाहिरातीमधील असल्याचं म्हटलं जातंय. वर्ल्ड कपनिमित्त एका खास जाहिरातीमधील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.