Kapil Dev : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...कपिल देव यांनी सांगितला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर
यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप असून त्याचं यजमानपद भारताकडे आहे. या वर्ल्ड कपच्य पार्श्नभूमीवर भारतीय संघात वेगवेगळे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. याचाच धागा पकडत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Kapil Dev talk on Team India : यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप असून त्याचं यजमानपद भारताकडे आहे. या वर्ल्ड कपच्य पार्श्नभूमीवर भारतीय संघात वेगवेगळे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याकेड टी-20 संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेसाठीही बीसीसीआयने कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघामध्येही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याचाच धागा पकडत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी क्रिकेटमधील संघ निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कोणत्या गोष्टी हव्या त्यासुद्धा सांगितल्या आहेत. (Kapil Dev talk on World cup for team india latest marathi sport news)
वारंवार संघ बदलल्याने अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. भविष्यात भारताकडे तिन्ही फॉरमॅटसाठी भारताचे टी-20, एकदिवसीय आणि कसोटीसाठी वेगवेगळे संघ असू शकतात. मात्र एखाद्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे त्या मॅचविनर खेळाडूला तुम्ही बाहेर बसवत असाल तर हे धोक्याचं आहे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
तुमचा मुख्य संघ असला तरी दुसरा संघ असा हवा की ज्यामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असायला हवी. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी तुमचं नशीब आणि योग्य आयोयन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंचं फिट राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं कपिल देव म्हणाले.
दरम्यान, भारताकडे एक दर्जेदार संघ असायलाच हवा. ज्या खेळाडूंचं प्रदर्शन खराब होत आहे त्यांचा अपेक्षित असा संघाला काही उपयोग होत नसेल तर समजू शकतो. पण जर कालच्या सामन्यातील खेळाडू पुढच्या सामन्यामध्ये संघाबाहेर असेल तर हे एक क्रिकेटर म्हणून माझ्या समजण्यापलीकडचं असल्याचं म्हणत वारंवार संघात बदल करण्यावर कपिल देव यांनी सडकून टीका व्यक्त केली आहे.