Kavya Maran Speech In SRH Dressing Room : कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या हंगामात इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2024) विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स (Sunrisers Hyderabad) हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला अन् आयपीएल ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं आहे. तब्बल 10 वर्षानंतर कोलकाताला असा पराक्रम गाजवता आलाय. तर दुसरीकडे दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उचलण्याचं हैदराबादचं स्वप्न भंगलंय. त्यामुळे हैदराबादच्या  ड्रेसिंग रुममध्ये (Kavya Maran Dressing Room Video) नाराजीचं वातावरण पसरलं होतं. अशातच ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री झाली ती मालकीण काव्या मारनची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यावेळी काव्या मारन हैदराबादच्या कामगिरीवर नाराज असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, हैदराबादने सामना गमावला अन् काव्या मारन भावूक झाली. कॅमेऱ्यासमोर काव्या मारने कोलकाताच्या खेळाडूंचं टाळ्या वाजवत स्वागत केलं अन् खेळाडूंचं मनोबल उंचावलं. पण अखेर काव्याच्या अश्रूंचा बांध फुटला अन् तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच सामना संपल्यानंतर काव्या मारन हैदराबादच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचली अन् खेळाडूंचे आभार मानले.


काय म्हणाली Kavya Maran?


यंदाच्या हंगामात तुम्ही सर्वांनी खुप मेहनत घेतली आहे. त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटची तुम्ही व्याख्या बदलली. टी-ट्वेंटी क्रिकेट कसं खेळायचं हे तुम्ही दाखवून दिलंय. सध्या प्रत्येकजण आपल्या संघाविषयी चर्चा करतोय. केकेआर सुद्धा आपलं कौतूक करेल असेल. पण आपल्या वाट्याला नाराजी आली. त्याचं दु:ख वाटून घेऊ नका. मागल्या वर्षी आपण शेवटच्या क्रमांकावर होतो आणि आपण आता टॉपवर आलो. चाहत्यांना आल्याकडून अपेक्षा होत्या आपण खरंच खुप चांगलं खेळलो. त्यामुळे इथंपर्यंतचा प्रवास शक्य झाला, असं काव्या मारन म्हणाली.


पाहा Video



Amitabh Bachchan म्हणतात...


दरम्यान, काव्या मारनचा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून अमिताभ बच्चन यांना देखील रहावलं नाही. बच्चन यांनी ब्लॉगमध्ये काव्याचं मनोबल उंचावलं. मला तिच्यासाठी वाईट वाटतं. पण हरकत नाही, पण उद्या आणखी एक दिवस आहे. माय डिअर आणि  अपयशी होणाऱ्यांसाठी एक धडा आहे, आपली हार मानू नका कारण उद्या आणखी एक दिवस आहे, असं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan on Kavya Maran) म्हणाले.