RCB : कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर! आयपीएलच्या मध्यात `या` मराठमोळ्या क्रिकेटरची एन्ट्री
रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या (Royal Challengers Bangalore) चाहत्यांसाठी एक मोठी बाती समोर आली आहे.
Kedar Jadhav : रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या (Royal Challengers Bangalore) चाहत्यांसाठी एक मोठी बाती समोर आली आहे. सोमवारी आरसीबीने (RCB) टीम इंडियाचा ऑलराऊंडर केदार जाधवला आयपीएल 2023 च्या मध्यातच टीममध्ये समाविष्ठ करून घेतलंय. डेविड विलीच्या जागी या सिझनमध्ये केदार जाधवला (Kedar Jadhav) स्थान देण्यात आलं आहे. विलीने या सिझनमध्ये (IPL 2023) आरसीबीसाठी 4 सामने खेळले आहेत. यापूर्वी केदार (Kedar Jadhav) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.
आयपीएलममध्ये खरेदीदार नाही मिळाला
2019 नंतर केदार (Kedar Jadhav) टीम इंडियामधून बाहेर आहे. याशिवाय यंदाच्या ऑक्शनमध्ये त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. अखेर आयपीएलच्या मध्यातच आरसीबीने (Royal Challengers Bangalore) त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. 38 वर्षांच्या केदारला (Kedar Jadhav) एक कोटी रूपयांना टीममध्ये सामील करून घेतलंय.
केदार जाधव करत होता कॉमेंट्री
आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये केदार जाधवला (Kedar Jadhav) कोणत्याची फेंचायझीने खरेदी केलं नव्हतं. अशातच त्याने कॉमेंट्री करण्याचा निर्णय घेतला होता. जियो सिनेमावर सुरु असलेल्या मराठी कॉमेंट्रीमध्ये त्याने आतापर्यंत कॉमेंट्री केली होती. मात्र आता आरसीबीने (Royal Challengers Bangalore) विलीच्या जागी टीममध्ये केदारच्या (Kedar Jadhav) नावाचा विचार केलाय. खऱ्या अर्थाने केदारचं नशीब फळफळलं असं म्हणावं लागेल.
आरसीबीकडून यापूर्वीही खेळाला होता केदार
केदार जाधवसाठी आरसीबी (Royal Challengers Bangalore) फेंचायझी किंवा टीमचे खेळाडू काही नवीन नाहीयेत. केदार जाधव (Kedar Jadhav) याआधी आयपीएलमध्ये (IPL 2023) आरसीबीकडून खेळला आहे. 2016 आणि 2017 च्या सिझनमध्ये केदार आरसीबीच्या ताफ्यात होता. आता पुन्हा तो आरसीबीकडून मैदानावर खेळताना दिसणार आहे. केदारने आरसीबीकडून 16 डावांमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटने 309 रन्स केले आहेत.
आरसीबीची यंदाच्या सिझनमधील कामगिरी
यंदाच्या सिझनमध्ये आरसीबीच्या (Royal Challengers Bangalore) टीमची धुरा ही फाफकडून पुन्हा विराट कोहलीकडे (Virat kohli) देण्यात आली आहे. यंदाच्या सिझनमध्ये आरसीबीने (Royal Challengers Bangalore) आतापर्यंत 8 सामने खेळलेत. या 8 सामन्यांपैकी आरसीबीच्या टीमला केवळ 4 सामन्यांमध्ये विजय मिळवणं शक्य झालं आहे. त्यामुळे आता केदारचा आरसीबीच्या टीममध्ये समावेश केला जाईल.