फीफा: विश्वचषकासाठी गर्लफ्रेंडपासून अल्पसंन्यास
.....
नवी दिल्ली: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू केविन ट्रॅप हा फीफा विश्वचषकासाठी विशेष तयारी करत आहे. त्याच्या तयारीचीही जोरदार चर्चा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केविनने म्हटले होते की, फीफा विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन आपण गर्लफ्रेंड इजाबोल गोलार्टपासून काही काळ दूर राहणार आहोत. ज्यामुळे मला संघासाठी विशेष कामगिरी करता येईल.
गर्लफ्रेंडच्या सौंदर्याचे गायले गोडवे
राल्फ, डॉल्से, गब्बना, गिव्हेन्चीसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडेलिंग केलेल्या इजाबेल सोबत असलेल्या संबंधांमुळे केविन नेहमीच चर्चेत राहतो. केविनने स्वत:ही गर्लफ्रेंड इजाबोलच्या सौंदर्याचे गोडवे अनेक वेळा गायले आहेत. गेल्याच महिन्यात केविन आणि नेमार यांनी आपापल्या गर्लफ्रेंडसोबत रिसॉर्टमध्ये दिसले होते. त्या वेळी या दोन्ही कपलबाबत प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा झाली होती.
फीफाचा जल्लोष
दरम्यान, फीफा फुटबॉल विश्वचषकासाठीची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच जगभरातील फुटबॉल चाहत्यांना या जल्लोषाचा आनंद घेता येणार नाही.