नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट टीमचा धडाकेबाज बॅट्समन केविन पीटरसन याने मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)च्या तिसऱ्या टुर्नामेंटनंतर केविन पीटरसन क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.


केविन पीटरसनने दुबईला रवाना होण्यापूर्वी आपल्या मुलाची गळाभेट घेतली. या भेटीचा एक फोटोही इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.


केवीन पीटरसनने क्रिकेट करिअरमधून निवृत्ती घेत असल्याचे संकेत देत म्हटलं की, "क्रिकेटरच्या रुपात जेसिका टेलर आणि आपल्या मुलांना अनेकदा बाय-बाय म्हटलं. मात्र, आता ही शेवटची वेळ आहे. मला बाय-बाय म्हणायला वाईट वाटतयं मात्र, हे काम आहे आणि करावं लागत आहे."


पीटरसन पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. पहिल्या दोन पीएसएलच्या फायनलमध्ये क्वेटाच्या टीमला जागा मिळवून देण्यात पीटरसनने महत्वाची भूमिका निभावली.



२००५ साली आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या पीटरसनने इंग्लंडच्या टीमसाठी १०४ टेस्ट, १३६ वन-डे आणि ३७ टी-२० मॅच खेळल्या आहेत. त्याने आपल्या टेस्ट करिअरमध्ये २३ सेंच्युरी आणि ३५ हाफ सेंच्युरी करत ८,१८१ रन्स बनवले आहेत. तर, १३४ वन-डे मॅचेसमध्ये ४१.३२ च्या सरासरीने ४,४४२ रन्स केले आहेत. यामध्ये ९ सेंच्युरी आणि २५ हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.


पीटरसन इंग्लंडचा तिसरा बॅट्समन आहे ज्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचेसमध्ये हजाराहून अधिक रन्स केले आहेत. यासोबतच इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पीटरसनने सर्वाधिक रन्स बनवणारा पाचवा बॅट्समन बनला आहे.