नवी दिल्ली :  तुमचा फेव्हरेट संघ एखादा सामना पराभूत झाला तर तुम्ही रिअॅक्शन काय होईल.  तुम्ही एखाद्या खेळाडूला दोषी धराल तर एखाद्याला वाईट शब्दांत भलामण कराल. नाही तर एका कोपऱ्यात बसून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न कराल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यावर एक मुलगा जोरजोरात रडू लागला. तो ज्या पद्धतीने रडू लागतो त्याची निरागसता पाहून तुम्हांला हसू येईल. 


हा व्हिडिओ  फेसबूकवर व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. सध्या तो पराभवानंतर अस्वस्थ असेल पण या व्हिडिओने त्याचा मूड नक्की हलका होईल. 


 



का रडतो चिमुरडा...


जडेजाने हार्दिक पंड्या बाद केल्यानंतर हा मुलगा रडायला लागला. त्याला इतका राग आला की तो आपल्या आईवरही तो राग काढत आहे. त्याची आई म्हणते पंडा खेळला असता तरी टीम इंडिया पराभूत झाली असती.... त्यावर त्याचा राग पाहण्यासारखा आहे. 


छोटा फटका खूप डेडली... 


या व्हिडिओत रडणाऱ्या मुलाचा लहान भाऊही आहे. तो म्हणतो, पंड्या विराट कोहलीला सर्व गोष्ट सांगेल. त्याच्या या चुकीसाठी तो जडेजाला संघातून बाहेर काढेल. हास्याची कारंजी फुलविणारा हा व्हिडिओ तुम्हीही पाहा..