मुंबई: मुंबई इंडियन्स संघाने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा ३७ धावांनी पराभव केला. या विजयात मुंबईची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा मोठा वाटा राहिला. या सगळ्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने पकडलेला झेल सगळ्यांची वाहवा मिळवून गेला. सीमारेषेवर सुरेश रैनाचा अफलातून झेल पकडत पोलार्डने सर्वांनाच थक्क करून सोडले. रैना चांगली फटकेबाजी करत असल्यामुळे मुंबईसाठी धोकादायक ठरू शकला असता. मात्र, जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर रैनाने टोलावलेला चेंडू पोलार्डने हवेत उडी मारून पकडला आणि मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. पोलार्डने घेतलेल्या या कॅचची क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या १७१ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १३३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. चेन्नईकडून केदार जाधवने सर्वाधिक ५८ धावा केल्या. मात्र, चेन्नईच्या इतर फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन, तर बेहरेनडॉर्फने दोन बळी मिळवले.



यंदाच्या आयपीएलमधला मुंबईचा हा दुसरा विजय आहे. तर या मोसमातला चेन्नईचा हा पहिलाच पराभव आहे. याआधीच्या तिन्ही मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला होता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईचे ६ आणि मुंबईचे ४ पॉईंट्स आहेत.