Hardik Pandya IPL 2024: आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीमने एक मोठा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्माला बाजूला सारून ट्रेड केलेल्या हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. मात्र मॅनेजमेंटचा हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांना मात्र पटलेला नाही. यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांना ट्रोल केलं गेलं. या प्रकारानंतर हार्दिक पंड्या चाहत्यांच्या समोर आला होता. यावेळी चाहत्यांनी त्याच्या समोर रोहित शर्माचे नारे लगावले. मात्र या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे ते पाडताळून पाहूयात


एअरपोर्टवर स्पॉट झाला हार्दिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्यानंतर मुंबईच्या एअरपोर्टवर हार्दिक पंड्याला स्पॉट करण्यात आलं. यावेळी चाहत्यांना संताप अनावर झाला होता. हार्दिक पंड्याला पाहून चाहत्यांनी 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' असे नारे लगावण्यास सुरुवात केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. रोहितच्या चाहत्यांच्या या घोषणा ऐकून हार्दिक काहीसा चिडलेला असल्याचं बोललं जातंय. मात्र हा व्हिडीओ खरा नसून एडिट करण्यात आलाय. त्यामुळे हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं पडताळणीत समोर आलंय.


हार्दिक पंड्या दुखापत ग्रस्त


हार्दिक पंड्या अजूनही वर्ल्डकपमध्ये झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताच्या आगामी T20 सिरीजमधून तसंच आयपीएलमधून बाहेर जाऊ शकतो. याबद्दल कोणतंही अधिकृत अपडेट देण्यात आलेलं नाही. याशिवाय बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'हार्दिक पांड्याच्या आयपीएलमधील खेळण्यावर देखील सस्पेंस आहे.'



हार्दिकने टीमसमोर ठेवली होती अट?


जेव्हा मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) ट्रेडसाठी हार्दिकशी बोलणी केली, तेव्हा हार्दिकने मुंबई इंडियन्ससमोर एक अट ठेवल्याचं समोर आलं होतं. मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) येणार असेल तर कॅप्टन्सीची जबाबदारी पण द्यावी, असं हार्दिकने ( Hardik Pandya ) सांगितलं होतं. मुंबईने ( Mumbai Indians ) यासाठी वेळ घेतला अन् रोहितशी संपर्क साधला. दरम्यान यावेळी रोहितने हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली खेळण्यास मंजुरी दिल्यानंतर हार्दिक नेतृत्व करणार असल्याची घोषणा करण्यात आली.