मुंबई: मास्क न घालता घराबाहेर पडू नये असं वारंवार सांगितलं असताना काहीवेळा घाईगडबडीमध्ये आपल्याकडून मास्क विसरतो. अनेकदा मास्क न लावणारे जुगाड करतात. कोलकाता संघातील एक खेळाडू असाच मास्क न लावता बाहेर पडला. त्याला आपण मास्क लावला नाही हे उशिरा लक्षात आलं मात्र तोपर्यंत पोलिसांनी त्याला अडवलं आणि शिक्षा देखील केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे पोलीस खूप जास्त कडक शिस्त पाळण्यासाठी नागरिकांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोलकाता संघातील स्टार फलंदाज राहुल त्रिपाठी विनामास्क पोलिसांच्या तावडीमध्ये सापडला. त्यांना सोडलं नाही बरं का! पोलिसांनी सर्वसामन्य नागरिकांना जी शिक्षा होते अगदी तशीच शिक्षा राहुलला देखील दिली. 


विनामास्क फिरल्यामुळे राहुल त्रिपाठीला पोलिसांनी 500 रुपये दंड भरायला लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल त्रिपाठी विनामास्क आपल्या कारमधून पुण्यातून कुठेतरी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी त्यांना अडवून मास्क लावण्याच्या सूचना दिल्या आणि 500 रुपये दंड देखील भरायला लावला.


कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. या लाटेमध्ये अनेक लोकांनी आपल्य़ा जवळच्या व्य़क्ती गमावल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार सध्या रिकव्हरी रेट 90 टक्के आहे. मात्र त्याच सोबत 24 तासाला साधारण दीड लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. तर साडेतीन हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.