KKR Flight Diverted to Varanasi: सध्या आयपीएल सुरु असून क्रिकेटच्या मैदानावर अनेक घटना घडतायत. अशातच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमसोबत मैदानाच्या बाहेर देखील एक मोठी घटना घडली आहे. लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्धच्या सामन्यातनंतर ही घटना घडली. यावेळी कोलकाताच्या टीमचं विमान अचानक डायवर्ट करण्यात आलं. रात्री 1.20 मिनिटांनी ही घटना घडली. नेमकं यावेळी काय घडलं ते पाहूयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 98 रन्सच्या मोठ्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सची टीम घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी कोलकात्यामध्ये परतणार होती. मात्र असं झालं नाही. रात्री 1.20 वाजता कोलकाताहून आलेलं टीम फ्लाइट अचानक वाराणसीकडे वळवण्यात आलं. एवढंच नाही तर याआधी टीमचं फ्लाइट गुवाहाटीकडे वळवण्यात आलं होतं. 


पहिल्यांदा गुवाहाटी मग वाराणसी....असं का?


कोलकात्यामधील खराब हवामानामुळे केकेआरचे विमान उतरू शकलं नाही. या घटनेची माहिती KKR टीमने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून दिली. 6 मे रोजी लखनऊहून टीम फ्लाइटने कोलकात्यासाठी उड्डाण केलं, हवामान खराब असल्यामुळे ते गुवाहाटीला डायवर्ट केलं. 


या घटनेची माहिती देताना केकेआरच्या सोशल मीडियावर लिहिण्यात आलंय की, 'ट्रॅव्हल अपडेट: खराब हवामानामुळे केकेआरचं लखनऊ ते कोलकाता हे चार्टर फ्लाइट गुवाहाटीकडे वळवण्यात आलं. विमान सध्या गुवाहाटी विमानतळावर आहे. 



मध्यरात्री विमानाचं वाराणसीला झालं लँडिंग


गुवाहाटी विमानतळावरून कोलकातातील चार्टर विमानाने पुन्हा उड्डाण केलं, परंतु त्यावेळीही लँडिंग कऱण्यात यश आलं नाही. यानंतर विमान वाराणसीकडे डायवर्ट कऱण्यात आले. याबाबत अपडेट देताना कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने म्हटलं की, 'सकाळी 1:20 वाजता अपडेट: खराब हवामानामुळे कोलकात्यात लँड करण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे यानंतर फ्लाइट वाराणसीकडे वळवण्यात आलं आहे. सध्याचे ठिकाण: लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. यावेळी महाराष्ट्राच्या सत्ता बदलावेळी नेते गुवाहाटीला गेले होते. यामुळे चाहत्यांसमोर पुन्हा एकदा हे चित्र समोर आलं होतं. 


यानंतर पुढील अपडेट देताना, KKR ने लिहिलं, 'अपडेट 3:00 am: KKR टीम वाराणसीमधील हॉटेलमध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी चेक-इन करेल. मंगळवारी दुपारी कोलकाताचं परतीचं विमान आहे.


प्लेऑफ गाठणार का KKR


यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने आतापर्यंत चमकदार कामगिरी केलीये. सध्या कोलकात्याची टीम पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. केकेआरने 11 सामने खेळले असून त्यात 8 विजय आणि 3 पराभवांचा समावेश आहे. आता केकेआरने उरलेल्या तीनपैकी एकही सामना जिंकला तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे.