केकेआरमधून गंभीर आऊट, शाहरूखने दिली प्रतिक्रीया
शाहरुखच्या चाहत्याने ट्विटरवर त्याला `गंभीर प्रकरणी` छेडले. त्यावर शाहरुख न त्याला उत्तर दिले.
मुंबई : २०११ पासून केकेआर टीमचा कॅप्टन असणारा गौतम गंभीर आता या टीममध्ये नसणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनवेळा चॅम्पियनपद पटकावले.
पण यावेळेसे दिल्ली डेअर डेविअल्स संघाने गंभीरला २ कोटी ८० लाखांना खरेदी केले. केकेआरच्या चाहत्यांमध्ये यामूळे प्रचंड नाराजी आहे.
गंभीरची कमतरता जाणवेल
गौतम गंभीरला का खेळवले नाही याबद्दल केकेआरचा मालक शाहरूख खानला विचारण्यात आले.
शाहरुखच्या चाहत्याने ट्विटरवर त्याला 'गंभीर प्रकरणी' छेडले. त्यावर शाहरुख न त्याला उत्तर दिले. ‘गंभीरची कमतरता जाणवेल’ असे रिट्विट शाहरुख खानने केले.
हा गंभीरचा निर्णय
दरम्यान‘कोलकात्यापासून वेगळं होण हा निर्णय स्वतः गंभीरनेच घेतला होता. तसेच मला आरटीएमनेही खरेदी करू नका अशी विनंतीही गंभीरनं केल्याचे कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंकी मैसूर यांनी सांगितले.
केकेआरचा कर्णधार कोण ?
गौतम गंभीर केकेआरचा हिस्सा नसताना आता केकेआरची धुरा कोण संभाळणार ? याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.
पण अद्याप टीमकडून याबाबत कोणती स्पष्टता देण्यात आली नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीरचा सहकारी रॉबीन उथ्थपाचा विचार कर्णधार पदासाठी केला जाऊ शकतो.