कॅप्टन श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली करणार बॅटिंग
कोलकाता टीमने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोलकाता विरुद्ध दिल्ली आज सामना होत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. कोलकाता टीमला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वामध्ये कोलकाता टीम चांगलं नेतृत्व करत आहे.
कोलकाता टीमने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंतच्या टीमला फलंदाजी करावी लागणार आहे. दिल्ली टीमने एक मोठा बदल केला आहे. एनरिक नॉर्किया ऐवजी खलील अहमदला टीममध्ये खेळण्याची संधी दिली आहे.
कोलकाता टीम प्लेइंग इलेव्हन : व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार) नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, रासिख सलाम, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली टीम प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, डेव्हिड वार्नर, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
कोलकाता टीमने 4 सामने खेळून त्यापैकी 3 जिंकले आहेत. आता श्रेयस अय्यरची टीम पाचवा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली टीम 3 पैकी 1 सामना हरले आहेत. तर दोन सामने जिंकले आहेत. दिल्ली टीमला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. प्ले ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी दिल्लीला अधिक पॉईंट्सची गरज आहे.
पॉईंट टेबलवर कोलकाता टीम आपला पहिला क्रमांक कायम ठेवणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वामध्ये कोलकाता टीम चांगल्याप्रकारे खेळत आहे.